हॉंगकॉंग राष्ट्रीय सुरक्षा विधेयक सादर

बीजिंग:  हॉंगकॉंगवर असलेले नियंत्रण कोणत्याही प्रकारे न सोडता ते आणखी कडक करणार असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. बीजिंगमध्ये सुरू असलेल्या नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या बैठकीत शुक्रवारी हॉंगकॉंग राष्ट्रीय सुरक्षा व सुव्यवस्था सुधारण्याचा एक नवीन विधेयक सादर करण्यात आले आहे. या विधेयकानुसार, हॉंगकॉंगमधील राष्ट्रीय सुरक्षा आणि परदेशी प्रभावाच्या कोणत्याही विषयावर चीन हस्तक्षेप करू शकणार आहे.

पीपल्स कॉंग्रेसमध्ये हे विधेयक सादर करताना स्थायी समितीचे उपाध्यक्ष वांग चेन म्हणाले, हॉंगकॉंगमधील वाढत्या राष्ट्रीय सुरक्षेचा धोका ही मोठी चिंतेचा विषय बनत आहेत. यामुळे एका देशासह दोन व्यवस्थांना हादरा बसला आहे. त्याचबरोबर याचा परिणाम राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि विकासावरही झाला आहे. अशा परिस्थितीत यावर कठोर निर्णय घेतले जाणे गरजचे आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या उपस्थितीत ठेवलेल्या या विधेयकात वांग चेन यांनी प्रामुख्याने 6 मुद्दे सादर केले आहेत. यात राष्ट्रीय सुरक्षा कडक संरक्षण, एक देश-दोन प्रणालीचे कायदे राखणे व त्यात सुधारणा करणे, कायद्यानुसार हॉंगकॉंग प्रशासन चालवणे, बाह्य हस्तक्षेपाविरुद्ध कठोर कारवाई करणे, हॉंगकॉंगच्या रहिवाशांच्या कायदेशीर हक्कांचे व हितसंबंधांचे रक्षण करणे आदींचा समावेश आहे.
दरम्यान, हॉंगकॉंगमधील स्वायत्त प्रदेशासंदर्भात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यावरून हॉंगकॉंगमध्ये निषेध करण्यात येत आहे. तसेच या विधेयकाला हॉंगकॉंग विधानसभागृहाच्या बैठकीत निषेध करण्यात आला. या बैठकीत राष्ट्रगीत विधेयकावर चर्चा सुरू असताना लोकशाहीच्या समर्थकांनी बीजिंगमधील स्टारे लीच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच हॉंगकॉंगमधील चीन सरकारच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.