हॉंगकॉंगच्या कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम यांना धक्काबुक्की

हॉंगकॉंग- हॉंगकॉंग शहराच्या विधीमंडळामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम यांच्या भाषणाच्यावेळी काही लोकप्रतिनिधींनी प्रचंड गोंधळ घातला आणि लॅम यांना धक्काबुक्की केली. यामुळे कॅरी लॅम यांनी आपले भाषण अर्धवट सोडले. त्यानंतर लोकशाही समर्थकांच्या चार महिन्यांच्या आंदोलनानंतर त्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न म्हणून लॅम यांचे भाषण पटलावर ठेवण्यात आले. परंतु यामुळे लोकशाही समर्थकांची तीव्र भूमिका सौम्य होण्याच्या ऐवजी विधीमंडळामध्ये ध्रुवीकरणच झाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम यांना सर्वात कमी जनप्रतिसाद लाभला आहे. लोकशाहीवादी आंदोलनादरम्यान तीन महिन्यांपूर्वी काही बुरखेधारी आंदोलकांनी विधान परिषदेच्या इमारतीची आणि फर्निचरची मोडतोड केली होती. त्यानंतर आज विधीमंडळाच्या नव्या अधिवेशनाला सुरूवात होत होती.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपले धोरण विषयक भाषण दोन वेळेस पहिल्यापासून सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र लोकशाहीवादी आंदोलनाच्या समर्थक लोकप्रतिनिधींनी घोषणाबाजी करून लॅम यांना भाषण थांबवण्यास भाग पाडले. यावेळी सभागृहात करण्यात आलेल्या निदर्शनांचे प्रसारण करण्यासाठी प्रोजेक्‍टरचाही वापर केला गेला.

मात्र लॅम यांना भाषण करताच न आल्यामुळे त्या प्रोजेक्‍टरवरून लॅम यांनी पूर्वीच रेकॉर्ड केलेला संदेश प्रसारित केला. या संदेशामध्ये लॅम यांनी घरे आणि जमीन पुरवठा वाढविण्याच्या योजनेची घोषणा केली होती. मात्र त्या योजनेत कोणतीही सवलत देण्यात आली नव्हती. त्यामुळे लोकशाहीवादी नेत्यांनी ही योजना लगेचच फेटाळून लावली.

सुरुवातीला हुकूमशही चिनी मुख्य भूमीला प्रत्यार्पण करण्यास परवानगी दिल्याच्या विरोधात लाखो लोक हॉंगकॉंगच्या रस्त्यावर उतरले होते. पण बीजिंग आणि लॅमने कट्टर भूमिका घेतल्यानंतर लोकशाही आणि पोलिसांच्या उत्तरदायित्वासाठी व्यापक चळवळीत थोडा सौम्यपणा आला. ब्रिटिश राजवटीतून हॉंगकॉंग चीनकडे परत जाण्याविषयीच्या 1997 च्या कराराच्या उलट, बीजिंगकडून स्वातंत्र्य कमी होत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.