मधाचे फायदे (भाग 2)

आयुर्वेदात तीन महान औषधी उपयुक्‍ततेची, रोजच्या व्यवहारात सहज मिळणारी, सुलभपणे वापरता येणारी द्रव्ये सांगितली आहेत. मध हे समस्त कफविकारावर व काही प्रमाणात पित्त विकारावर उपयुक्‍त, तत्काळ गुण देणारे हुकमी प्राणिज द्रव्य आहे. मध चवीने गोड व तुरट, स्वभावाने अति रुक्ष, सूक्ष्म शरीरात कोणत्याही भागात खोलवर पोचणारा आहे.

लिंबाबरोबर किंवा आल्याच्या रसाबरोबर मध घेतल्यास अग्निमांद्य दूर होते. कफप्रधान आम्लपित्तात तुळशीच्या रसाबरोबर मध गुण देतो. स्थूल स्त्रियांच्या पांढरे जाणे या तक्रारीत मधाचा उपयोग करावा. कोणत्याही उलटीच्या तकारीत लहान प्रमाणात मध घेतला तर उलटी थांबते मोठ्या प्रमाणावर मध घेतला तर उलटी होते. त्याचा उपयोग फाजील कफ असलेल्या दमा, खोकला या विकारात होतो. लहान व कृश बालकांकरिता मधासारखे टॉनिक नाही. महागड्या रंगीबेरंगी आकर्षक बाटल्यातल्या टॉनिकपेक्षा शंभर- दोनशे ग्रॅम मध बालकांना मोठे वरदान आहे. मधुमेही माणसाने मध घेऊ नये.

गंडमाळा, उर:क्षत, क्षय, छातीत कफामुळे दुखणे, सर्दी पडसे, खोकला, दमा, आवाज बसणे, स्वरभंग, हृद्रोग या सर्व प्राणवह स्रोतसाच्या विकारात मध हे एकेरी द्रव्य किंवा इतर पदार्थांबरोबर अनुपान म्हणून फार उपयुक्‍त आहे. मधाला योगवाही अशी रास्त संज्ञा आहे. मध, आपले गुण देतेच पण त्याचबरोबर ज्या पदार्थांबरोबर घ्याल, त्या पदार्थांचे गुणधर्म वाढवते. त्यामुळे तुळस स्वरस्‌, मिरी, लिंबू, स्वरस, तूप, दूध, पिंपळी, चूर्ण, वेखंड, हळद अशा विविध पदार्थांबरोबर अनुपान म्हणून मधाचा वापर होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कृश व्यक्‍तीला मध तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर द्यावा. खोकल्यात तुळस रस किंवा पिंपळी चूर्ण बरोबर द्यावा. अजीर्ण असून ताकद हवी असल्यास आले किंवा लिंबूरसाबरोबर घ्यावा. उचकी लागल्यास मध व वेलदोड्याची जाळून केलेली राख असे मिश्रण चाटवावे. उचकी लगेच थांबते. जगात कोणत्याही प्राण्याची कोणतीही जखम मग ती मधुमेह किंवा महारोगाची असो; भरून आणणे, वरील कारणाकरिता बाह्योपचारार्थ शोधन व रोपण करणारे मध हे फार हुकुमी द्रव्य आहे. मधामध्ये ड्रेसिंग द्रव्य आहे. गॅंगरीनमुळे कापावयास लागणारे पाय मधाच्या ड्रेसिंगमुळे वाचले आहेत. तोंड येणे, भाजलेल्या जखमा याकरिता मधाचे प्रतिसारण करावे.

मधाचे फायदे (भाग 1)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)