नवी दिल्ली – कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत.त्याचबरोबर चलन बाजारातील अस्थिरतेमुळे होंडा कार कंपनी आपल्या वाहनांच्या किमतीत पुढील महिन्यापासून 1.2 टक्क्यापर्यंत वाढ करण्याच्या विचारात आहे.
आतापर्यंत आम्ही चलनातील स्थिरतेची वाट पाहिली. मात्र आता दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात कंपनीने याच कारणामुळे दरवाढ केली होती. आता पुन्हा दर वाढ होणार आहे.