‘होंडा’ आणणार भारतात प्रथमच ‘लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह’ होंडा सिटी!

पुणे – होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) यांनी जाहीर केले आहे की नुकतीच बाजारात उतरलेल्या पाचव्या आवृत्तीच्या नवीन होंडा सिटी निर्यातीसाठी भारतात प्रथमच लेफ्ट हॅन्ड ड्राईव्हचे मॉडेल तयार करीत आहे.  कंपनीचे म्हणणे आहे की या माध्यमातून भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी असलेली आपली वचनबद्धता ती आणखी मजबूत करेल.

होंडा कार्स इंडियाने 5 व्या आवृत्तीच्या होंडा सिटीची निर्यात सुरू केली असून पहिल्या तुकडीने गुजरातमधील पिपावाव बंदर आणि चेन्नईच्या एन्नोर बंदर येथून मध्य पूर्व देशांमध्ये प्रस्थान केले.  होंडा कार्स इंडिया मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून नवीन होंडा सिटीचे राईट हॅन्ड ड्राइव्ह मॉडेल्स दक्षिण आफ्रिकेत निर्यात करीत आहे. ऑक्टोबर २०२० पासून कंपनीने शेजारचे देश नेपाळ आणि भूतानला निर्यात करण्यास सुरवात केली.

होंडा सिटी ही भारतातील सेडान सेगमेंट कारची एक बेंचमार्क आहे आणि लेफ्ट हॅन्ड ड्राईव्हचे मॉडेल पूर्णपणे नवीन बाजारपेठेत निर्यात केल्यास भारताचा व्यवसाय वाढविण्याची मोठी संधी आहे.  जागतिक स्तरावर कंपनीने उत्पादन प्रकल्प बनविण्यासाठी मोठी गुंतवणूक केली असून राईट हॅन्ड ड्राइव्ह व लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह असे दोन्ही ड्राईव्ह मॉडेल्स तयार करण्यात येणार आहेत. 

कंपनीच्या म्हणण्यानुसार यामुळे त्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यास मदत होईल. पाचव्या आवृत्तीच्या होंडा सिटीला भारतीय बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीच्या ‘मेक इन इंडिया’ च्या बांधिलकीच्या अनुषंगाने होंडा कार्स इंडिया लिमिटेड आपल्या सर्व मॉडेल्सचे उत्पादन  90 टक्क्यांहून अधिक लोकल उपकरणे वापरून तयार करीत आहे आणि यामध्ये एक मजबूत इको सिस्टम विकसित केली आहे. 

एचसीआयएल  नेपाळ, भूतान, दक्षिण आफ्रिका आणि एसएडीसी देशांना अमेझ, डब्ल्यूआर-व्ही आणि सिटी यासह विविध मॉडेल्सचे निर्यात करीत आहे.  पाचव्या आवृत्तीच्या नवीन होंडा सिटी (राईट हॅन्ड आणि लेफ्ट हॅन्ड ड्राइव्ह ) भारताच्या निर्यात व्यवसायासाठी एक नवीन अध्याय ठरू शकेल.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.