होमिअोपॅथी आता आणखीन सुरक्षित (भाग २)

-डाॅ.राजीव कोटगीरे, डाॅ.अशोक बोंगुलवार

नवीन पॅकिंग तंत्रज्ञान आणि आधुनिक डिस्पेन्सिंग पद्धतींमुळे रुग्णांना मिळणाऱ्या होमिओपॅथी औषधांच्या पद्धतींमध्ये काही सकारात्मक बदलांना चालना मिळाली आहे.

या व्यतिरिक्‍त आता डॉक्‍टरांनी आपल्या क्‍लिनिकमध्ये ब्रॅंडेड औषधे विकणे बंद केले आहे. पात्रता नसलेल्या लोकांना या औषधांना देण्यापासून निर्बंधित करण्यात आले आहे. डिस्पेन्सर्स आता निर्मात्याने सीलबंद पॅकिंगमधली औषधे विकतात, यामधून ग्लोब्यूल्समधली, पाणी किंवा मिल्क शुगरमधली किंवा होमिओपॅथिक डॉक्‍टरांच्या शिफारशीनुसार केलेली औषधे वगळली गेली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ओटीसी ब्रॅंडेड होमिओपॅथिक औषधे देणा-या फार्मसी आता सुरक्षा, सक्षमता तसेच भारत सरकारच्या वर्तमान नियमांनुसार या औषधांच्या दर्जाची शाश्‍वती देण्यासाठी आवश्‍यक ती पात्रता असलेल्या लोकांची नियुक्ती करताना आढळतात.

गुड मॅन्युफॅक्‍चरिंग प्रॅक्‍टिसेस (जीएमपी)च्या अनुसरणासोबत, निर्माते आता वापरलेल्या कच्च्या मालाची श्रेणीदेखील स्पष्ट करण्यामार्फत होमिओपॅथिक औषधांच्या स्वरूपाच्या मानक दर्जात सुधारणा करत आहेत. या नवीन उपाययोजनांमुळे शहरातील होमिओपॅथीला पसंती देणाऱ्या लोकांनी आता निश्‍वास टाकला आहे. सध्या सुटी औषधे विकणारी अनेक दुकाने आहेत, जी यथायोग्य पद्धतींची अजिबात पर्वा करत नाहीत.

ग्राहक होमिओपॅथी डॉक्‍टरांनी घटकांची नावे असलेली लेबल्स लावलेली औषधे देण्याची मागणी करतात. उशिरा का असेना, अनेक लोक आता फॅक्‍टरी सीलबंद बाटल्यांमध्ये बनवलेल्या औषधांकडे तसेच प्रि सील ट्यूब्सकडे वळले आहेत, ज्यांचे उत्पादन बोइरॉनसारख्या जर्मन आणि फ्रेंच कंपन्यांमार्फत केले जाते.

आधुनिक पॅकेजिंग आणि नवीन डिस्पेन्सिंग पद्धती सोबत वाढलेल्या सुरक्षितता, दर्जा तसेच होमिओपॅथी औषधांच्या सक्षमता रुग्णांसाठी जणू वरदानच ठरल्या आहेत. होमिओपॅथिक पध्दती ऍलोपॅथीप्रमाणेच मानकी.त बनल्या आहेत, कारण आता रुग्णांना त्यांच्या औषधांसाठी डॉक्‍टरांवर अवलंबून रहावे लागणार नाही. त्यांना आता फार्मसींमधून त्यांची औषधे सहज मिळू शकतील.

होमिओपॅथी आजाराचा नव्हे तर आजारपणाचा उपचार करते आणि ते लाइक क्‍युअर्स लाइक या तत्वावर आधारलेले आहे. ही औषधांची जगातील दुस-या क्रमांकावरील यंत्रणा असून यामध्ये व्यक्‍तिगत उपचारावर लक्ष केंद्रित केले जाते. भारतात, होमिओपॅथीचा उपयोग सर्वात जास्त पसंतीची यंत्रणा म्हणून केला जातो मग तो सर्वसामान्य आजार असो किंवा दुर्धर व्याधी असो. होमिओपॅथीक औषधांची माफकता आणि दुष्परिणाम न आढळण्यामुळे ऍलोपॅथिक औषधांच्या तुलनेत या औषधांचे जास्त आकर्षण आहे.

जर योग्य निदान केले गेले, तर आजार तात्काळ बरा करण्याची होमिओपॅथीमध्ये क्षमता आहे. होमिओपॅथी औषधांची सुरक्षा आणि प्रभावीपणा ऍलोपॅथीच्या तुलनेत कितीतरी प्रमाणात जास्त आहे, कारण ती केवळ लक्षणांनुसार नव्हे तर आजाराच्या मुळाशी जाऊन त्याचे कारण शोधतात. प्रतिकार शक्ती त्यांच्यामुळे प्रभावी बनते आणि शरीराला स्वत:हून संक्रमणाचा सामना करण्यासाठी मदत करते.

होमिअोपॅथी आता आणखीन सुरक्षित (भाग १)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)