Homemade Facial: आजकाल त्वचेच्या काळजीसाठी लोक महागड्या पार्लर ट्रीटमेंट्स आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सकडे धाव घेतात. पण तुमच्या स्वयंपाकघरातच अशा काही गोष्टी आहेत, ज्यांच्या मदतीने त्वचेला नैसर्गिक आणि सुंदर निखार देता येतो. संत्र्याची साले आणि उरलेली कॉफी यांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी सोपं आणि झिरो वेस्ट फेशियल करू शकता. हिवाळ्यात संत्री खाल्ली जातातच, पण त्यांची साले बहुतांश वेळा फेकून दिली जातात. मात्र या साली त्वचेसाठी खूपच फायदेशीर असतात. संत्र्यातील व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळ बनवतात, तर कॉफी डेड स्किन काढून टाकायला मदत करते. Home Remedies For Glowing Skin संत्र्याच्या सालींची पावडर संत्र्याच्या साली उन्हात वाळवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. या पावडरमध्ये असलेलं सिट्रिक अॅसिड (Citric Acid )त्वचेवरील डाग कमी करतं आणि छिद्रांची स्वच्छता करतं. एका चमचाभर पावडरमध्ये थोडं कच्चं दूध मिसळा आणि चेहऱ्यावर २ मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा लगेच फ्रेश वाटते. कॉफी स्क्रब उरलेल्या कॉफीमध्ये अर्धा चमचा मध किंवा नारळाचं तेल मिसळा. कॉफीमधील कॅफीन रक्ताभिसरण वाढवतं, ज्यामुळे त्वचा घट्ट दिसते आणि डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. हलक्या हाताने गोलाकार हालचालीत स्क्रब करा. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरतो. Coffee Scrub For Face फेस मास्क फेशियल पूर्ण करण्यासाठी मास्क तयार करा. संत्र्याच्या सालींची पावडर, थोडी कॉफी आणि दही एकत्र मिसळा. दह्यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला ओलावा देतं, तर संत्र्यातील व्हिटॅमिन C रंगत सुधारतं. हा मास्क १५ मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. हा उपाय खास का आहे? इको-फ्रेंडली: स्वयंपाकघरातील उरलेलं साहित्य पुन्हा वापरता केमिकल फ्री: कोणतेही घातक रसायन नाही स्वस्त आणि परिणामकारक: पार्लरसारखा निखार, तोही अगदी कमी खर्चात तुमची त्वचा फार सेंसिटिव्ह असेल, तर चेहऱ्यावर लावण्याआधी पॅच टेस्ट करा. संत्र्याच्या सालींमुळे थोडी झिणझिणी येणं सामान्य आहे.