न्हावरेत होम क्वारंटाईन रुग्ण मोकाट; पोलीस करणार कारवाई??

न्हावरे (योगेश मारणे) – सावधान!!!तुम्ही जर न्हावरे गावात येत असाल.तर,तुम्ही अगदी सहज करोना पॉसिटीव्ह रुग्णाला भेटून आलेले आहात. हो…..हे अगदी खरे आहे. कारण,न्हावरेत करोना संसर्गाने पॉसिटीव्ही असलेले रुग्ण अगदी सहजरित्या सर्रास फिरताना आढळत आहेत.
त्यामुळे ग्राम प्रशासनाची डोके दुखी वाढली असून, अशा प्रकारे करोना संसर्ग सोबत घेऊन गावात मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती न्हावरेचे ग्रामविकास अधिकारी पोपट केदारी यांनी ‘प्रभात’शी बोलताना दिली.

मोकाट फिरणाऱ्या करोना पॉसिटीव्ह रुग्णांवर वचक बसावा व करोनाची साखळी तोडण्यासाठी न्हावरे ग्राम प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत.सुमारे पंधरा दिवसांपासून अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यवहार कडकडीत बंद आहेत. मात्र,होम क्वारंटाईन असलेले करोना पॉसिटीव्ही रुग्ण मोकाट फिरताना आढळून येत आहेत. अशा तक्रारी गावातील ग्रामस्थांकडून येत असल्यामुळे प्रशासनाकडून गावातील करोना पॉसिटीव्ही व्यक्तींची नावे पोलिसांना कळवली जाणार आहेत. त्यानंतर ते रुग्ण जर फिरताना आढळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचे ग्राम प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

न्हावरे गावासह गाव व परिसरात सुमारे ७० हून अधिक करोना पॉसिटीव्ही ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.तसेच गावात कोविड सेंटर आहे परंतू,ते आगोदरच हाऊसफुल्ल असल्यामुळे तेथील संबंधित वैद्यकीय अधिकारी कोविडची सूक्ष्म लक्षणे असलेल्या व्यक्तींना घरीच होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देत आहेत. मात्र,असे रुग्ण होम क्वारंटाईन राहण्याऐवजी गावात मोकाट फिरत असून,करोना बाबत उपदेशाचे डोस पाजत आहेत.अशा प्रकारच्या करोना पॉसिटीव्ह रुग्णांवर कारवाई व्हावी.अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.