प्रेमाला घरचा विरोध; प्रेयसीची भारतात, तर प्रियकराची दुबईत आत्महत्या

नवी दिल्ली –रिलेशनमध्ये असताना प्रेमीयुगूल जास्तकाळ एकमेकांपासून दूर राहू शकत नाही, हे सत्य आहे. प्रेमात अंतर पडलं की प्रेम कमी होत, अशी भावना भावना निर्माण होते. मात्र असंही कपल आहे, ज्यांचं प्रेम दूर राहून देखील तिळमात्र कमी झाल नाही. एवढच काय तर भारतात राहणाऱ्या प्रेयसीने घरच्या विरोधाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर दुबईत राहणाऱ्या तिच्या प्रियकराने आत्महत्या केली आहे.

घरातून प्रेमाला किंवा प्रेम विवाहाला विरोध झाला की, कपल्स घर सोडून पळून जाण्याचा पर्याय निवडतात. तर काही कपल्स जीवन संपविण्याचा मार्ग निवडतात. असाच काहीसा प्रकार तेलंगणामध्ये समोर आला आहे.  या प्रकरणात मुलीने तेलंगणातील आपल्या गावी तर प्रियकराने दुबईत आत्महत्या केली.

मृत तरुणीचे नाव मनिषा आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपले जीवन संपवले. हे वृत्त तरुणीच्या दुबईतील प्रियकराला समजताच त्याने देखील आत्महत्या केली. त्याचे नाव राकेश असं होते. मनिषा आणि राकेश या दोघांना लग्न करायचे होते. मात्र त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. अखेर निराश झालेल्या तरुणीने जीवन संपविण्याचाच मार्ग निवडला.

दरम्यान राकेश याने दुबईत आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये तो रडताना दिसत असून मनिषाशिवाय आपण जगू शकत नाही, अस म्हणत त्याने आत्महत्या केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.