ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी गृह मंत्रालयाकडून उपाययोजना

नवी दिल्ली : ऑनलाईन घोटाळे आणि फसवणुकीला आळा घालून वापरकर्त्यांचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने अनेक पावले उचलली आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. फोनफ्रॉड अर्थात फोनद्वारे होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात आंतर मंत्री समिती स्थापन करण्यात आली आहे.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, वित्तीय सेवा, दूरसंचार विभाग, रिझर्व्ह बॅंक, यांच्या सदस्यांचाही यात समावेश आहे. असे घोटाळे टाळण्यासाठी 12 फेब्रुवारी 2018 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एक सूचनावली जारी करण्यात आली असून ही सूचना गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

डिजिटल, इलेक्‍ट्रॉनिक व्यवहारांच्या सुरक्षिततेसंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने अनेक परिपत्रके, मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सायबर गुन्ह्यांसंदर्भात जनजागृतीसाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. केंद्र सरकारनेही नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल सुरू केले असून, यावर ऑनलाईन आणि नेटद्वारे होणारे घोटाळे आणि फसवणुकीच्या तक्रारी नोंदवता येताता, असे या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.