सातारा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे श्री. देशमुख यांच्या दौर्याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहीले आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने देशमुख हे राज्यातील अनेक जिल्ह्यात दौरा करून प्रशासनाकडून रुग्ण संख्या, आवश्यक सोई सुविधा याची माहिती घेत आहेत. तसेच त्या त्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेबाबत ते वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडून आढावा घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा जिल्ह्याचा आढावा रविवारी सकाळी साडे अकरा वाजता घेणार आहेत. तत्पपूर्वी ते सातारा जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींशी सातारा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती , कायदा व सुव्यवस्था य़ाबाबत चर्चा करणार आहेत.