पुणे- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक पदाच्या निवडणुकीसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. संचालक पदाच्या 21 जागांसाठी आतापर्यंत 66 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
“पीडीसीसी’ बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक असून मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. गुरुवारी अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकांमार्फत सादर केला. शुक्रवारी गृहमंत्री वळसे पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीसाठी आतापर्यंत 173 जणांनी 532 उमेदवारी अर्ज नेले आहेत.