पुणे: कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प आहे. मात्र हातावर पोट असलेल्या कुटुंबाना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
शांताबाई पवार आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भागवण्यासाठी पुण्यातील रस्त्यावर लाठ्याकाठ्यांचा खेळ करत आहेत. त्याचा हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर अनेक लोक या आजीच्या मदतीसाठी पुढे आले. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यातील हडपसर येथे शांताबाई पवार यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन स्वतः भेट घेतली.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1279443099062059/
या भेटीदरम्यान, गृहमंत्र्यांनी शांताबाई पवार यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या लाठ्याकाठ्यांचा खेळाचं छोटस प्रात्यक्षिक पाहून टाळ्या वाजवून दाद दिली. तसेच यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शांताबाई यांना एक साडी आणि मदतीचा एक लाख रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच शासनाच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवुन देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.