मुंबई – परमीवीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जे आरोप केले आहेत त्याची चौकशी करण्याचे काम राज्य सरकारने नेमलेल्या एक सदस्य चौकशी आयोगामार्फत सध्या सुरू आहे. या आयोगानेही परमीवरसिंह यांना नोटीस जारी करून 29 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. न्या. के. यु. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहे. आयोगाने या आधीच परमवीरसिंह यांच्या विरोधात जामीन पात्र वॉरंट जारी केले आहे.
29 नोव्हेंबर रोजी जर ते आयोगापुढे हजर झाले नाहीत तर त्यांच्या विरोधात या वॉरंटची अंमलबजावणी केली जाईल असा इशारा आयोगाने कालच दिला आहे. ते आजच आयोगापुढील चौकशीसाठी हजर राहणे अपेक्षित होते. परंतु त्यांच्या वकिलांनी सांगितले ती परमवीरसिंह हे आज ठाणे पोलिसांपुढे हजर राहिले असल्याने त्यांना आज येथे उपस्थित राहणे शक्य नाही. त्यानंतर आयोगाने त्यांना 29 तारखेला उपस्थित राहण्याची नोटीस जारी केली.