नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यभरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टींमध्ये लावलेल्या उपस्थिती म्हणजे केवळ दिखावा असल्याचं म्हंटलं आहे. याबाबत गिरीराज सिंह यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून नितीश कुमारांचे इफ्तार पार्टीतील काही फोटोज देखील शेअर केले आहेत.
यावरून आता, गृहमंत्री अमित शहा यांनी गिरीराज सिंह यांना चांगलेच सुनावले आहे. ‘अमित शहा यांनी गिरीराज सिंह यांना फोन करून, यापुढे अश्या प्रकारचे कोणतेही व्यक्तव्य करण्यास सक्त मनाई केली आहे’.
BJP President Amit Shah has called and asked Union Minister Giriraj Singh to avoid making statements (Singh tweeted pictures & commented on Bihar CM Nitish Kumar and other leaders attending 'Iftar' parties) pic.twitter.com/Wgc5XzOba3
— ANI (@ANI) June 4, 2019