देशातल्या अग्रणी बँकांनी कर्जावरील व्याजदर कमी केल्यामुळे गृहकर्जावरील व्याजदर दहा वर्षांमधल्या नीचांकी पातळीवर आले आहेत. स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा यासारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर ६ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.
हा व्याजदर ३१ मार्चपर्यंत लागू असेल असं बँकांनी सांगितलं आहे. बँकांकडील खेळत्या पैशाची समस्या वाढल्याने व्याज दरात कपात करण्यात आली आहे. बँकांना बचत खात्यांवर देखील व्याज द्यावे लागते, त्यामुळे अधिक प्रमाणात खेळता पैसा राहिल्याने त्यांच्यावर ताण येतो.
दुसरीकडे भारतीय रिझर्व बँकेने अर्थव्यवस्था पुनरूज्जीवित करण्यासाठी गेल्या वर्षी मार्चपासून रेपो दरांमध्ये २०० अंकांची कपात करुन तो ४ टक्क्यांवर आणला आहे. त्यामुळे धनकोंनी व्याज दर कपातीचा लाभ ग्राहकांना द्यावा असा रिझर्व बँकेचा आग्रह आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा