घाबरु नका! तुमच्या होम आणि कार लोनचा EMI आहे तेवढाच राहणार

आरबीआयच्या गव्हर्नरनी दिली ग्वाही

मुंबई – देशातील वाढत्या कोरोनाची स्थिती पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच RBI ने व्याज दरात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेपो दर 4% आणि रिव्हर्स रेपो दर 3.5% राहतील. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली 5 एप्रिलपासून जारी तीन दिवसीय मुद्रा धोरण समितीची (MPC) बैठक झाली. आरबीआयचे गव्हर्नर यांनी या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. नवीन आर्थिक वर्षाची (2021-22) ही MPC ची पहिली बैठक होती.

RBI दर दोन महिन्यांनी व्याज दरावर निर्णय घेते. हे काम 6-सदस्य चलनविषयक धोरण समिती (MPC) करते. गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर आमचे लक्ष आहे. म्हणूनच अकोमोडेटिव स्टांस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी MPC ची फेब्रुवारीमध्ये बैठक झाली. 5 फेब्रुवारी रोजी RBI ने रेपो दरात कोणताही बदल न करण्याची घोषणा केली होती.

गेल्या वर्षी मेपासून RBI ने पॉलिसीचे दर समान ठेवले आहेत. हे दर गेल्या 15 वर्षातील सर्वात कमी स्तरावर आहे. बँकांना दिलेल्या कर्जावरील रिझर्व्ह बँकेकडून घेतल्या जाणाऱ्या व्याजाला रेपो रेट असे म्हणतात. तसेच, बँकांनी जमा केलेल्या रुपयांवर आरबीआयकडून दिल्या जाणाऱ्या व्याजाला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.