लोणी काळभोर (पुणे) -करोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब, माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या योजने अंतर्गत लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व नागरिकांची तपासणी सोमवारी (दि. 21) सकाळी आठ वाजल्यापासून करण्यात येणार आहे.
या दिवशी संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद राहतील, अशी माहिती ग्रामविकास आधिकारी डी. के. पवार यांनी दिली. या दिवशी दवाखाने व मेडिकल स्टोअर वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद राहतील. गावातील सर्व नागरिकांनी त्या दिवशी घरीच थांबून संपूर्ण कुटुंबाची तपासणी करुन घ्यावी. सध्या कोविड-19 चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंब प्रमुखाने आपले कुटुंब सुरक्षित राहणेसाठी तपासणी करून घ्यावी. कोणीही कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामविकास आधिकारी डी. के. पवार यांनी केले आहे.