पुणे – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी मंगळवारपासून (दि.15) बोर्डातर्फे घरोघरी तपासणी सुरू करण्यात आली आहे.
सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्याधर गायकवाड म्हणाले, “प्रामुख्याने मायक्रो कंटेन्मेंट झोनवरही अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. रुग्णालयातर्फे आम्ही दहा टीम तयार केल्या आहेत. यामध्ये डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी असे चार जण असतील. या दहा टीम घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करतील. महात्मा गांधी रस्ता, शिवाजी मार्केट परिसर, न्यू मोलेदिना रोड, मोदीखाना यासारख्या परिसरात करोनाचे रुग्ण अधिक आढळून आले आहेत.’