पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या काळात बहुतांश जण सुप्त कला-गुणांना वाव देत आहेत. पुण्यातील एका कलाकाराने देखील कलेला वाव देत, घरबसल्या “म्युझिक व्हिडिओ’ प्रदर्शित केला आहे.
सध्या लॉकडाउनमुळे सर्वच जण “क्वारंटाइन’ असल्याने नागरिक लेखन, वादन, चित्रकला, हस्तकला आदी कलांसाठी वेळ देत आहेत. या वेळाचा उपयोग करून दिग्विजय जोशी यांनी घरबसल्या स्वरचित कवितेला चाल लावली. त्यानंतर मोबाइलवरच रेकॉर्डिंग करून “व्हिडिओ’ तयार करून प्रदर्शित केला आहे.
“घरबसल्या एखादा गाण्याचा व्हिडिओ करू, असा विचार आला. त्यानंतर माझे सहकारी मित्र गिटार वादक अभिजीत यादव यांना शब्द सांगून, त्यांनी गिटारचा आवाज रेकॉर्ड करून पाठवला. मी देखील गाणे घरीच रेकॉर्ड केले आणि मोबाईलवरच माझी पत्नी समा जोशी हिने शुटिंग केले. त्यानंतर घरीच याचे संकलन केले,’ अशी माहिती जोशी यांनी दिली. या व्हिडिओचे रेकॉर्डिंग करून आम्ही पाळून “घरी राहा’ असा संदेश दिला आहे. या निर्मितीमध्ये मुलगा देवांश जोशी, गिटार वादक अभिजीत यादव आदींचा सहभाग आहे, असे जोशी यांनी नमूद केले.