फायर इन्शुरन्स का गरजेचा?

file photo

घरात, कार्यालयात किंवा अन्य ठिकाणी आग कधीही व केव्हाही लागू शकते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. यामुळे घराचे, कार्यालयाचे अपरिमित नुकसान होऊ शकते. शहरात घरांना आग लागण्याचे प्रकार अगोदरच्या तुलनेत अधिक वाढलेले दिसून येतात. आगीमागचे कोणतेही कारण असो, त्यामुळे घरमालकाची आर्थिक हानी होते; परंतु अशा प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी फायर इन्शुरन्स उतरवणे हा उत्तम उपाय मानला जातो. या विम्याअंतर्गत घरात आणि घराबाहेर होणारे नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद केलेली असते. विमा उतरवताना घरातील सर्व सामानाची माहिती सादर करावी लागते. याप्रमाणे विम्यापासून अन्य अतिरिक्त लाभ देखील विमाधारकाला मिळते.

फायर इन्शुरन्समध्ये काय कव्हर होते?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केवळ इमारतच नाही तर सॅनिटरी फिटिंगची देखील भरपाई होते. गॅरेज, घरातील झाकलेल्या वस्तू, खासगी रस्ता, स्विमिंग पूल आणि कारंजे. आगीमुळे घराचा पाया खचत नाही किंवा नुकसान होत नाही. मात्र, भूकंपामुळे त्याची हानी होऊ शकते.

फायर इन्शुरन्सचे प्रकार

फायर इन्शुरन्समध्ये अनेक प्रकार असून आपल्या गरजेनुसार त्याची निवड करू शकतो.

स्पेसिफिक पॉलिसी :

याअंतर्गत इन्शुरन्स कंपनी मालमत्तेची हानी झाल्यास पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम प्रदान करते. ही रक्कम मालमत्तेच्या वास्तविक मूल्यापेक्षा कमी असू शकते. त्यामुळे कधी कधी पॉलिसीधारकाला नुकसानीचा एक भार सोसावा लागतो. कारण मालमत्तेच्या वास्तविक मूल्यांचे आकलन पॉलिसी उतरवताना केलेले नसते.

कॉम्प्रिहॅंसिव्ह पॉलिसी :

या पॉलिसीला ऑल इन वन पॉलिसी नावाने ओळखले जाते. कारण ही पॉलिसी केवळ आगच नाही तर चोरी, दरोडा, नैसर्गिक आपत्ती या कारणामुळे घराचे झालेले नुकसान भरून देण्याचे काम करते. याशिवाय थर्ड पार्टी रिस्क देखील कव्हर होते. याशिवाय जोपर्यंत पॉलिसीधारकाचा नव्याने व्यवसाय सुरू होत नाही तोपर्यंत नुकसान भरपाई देण्याचे कामही पॉलिसी करते.

व्हॅल्यूड पॉलिसी:

या पॉलिसीअंतर्गत मालमत्तेचे मूल्य अगोदरच तपासले जाते. मात्र, संभाव्य आगीमुळे होणाऱ्या वास्तविक नुकसानीकडे लक्ष दिले जात नाही. या पॉलिसीत झालेल्या करारानुसार रक्कम प्रदान केली जाते. मालमत्तेचे कितीही नुकसान झाले तरी अगोदर निश्चित केलेली रक्कम पॉलिसीधारकाला दिली जाते.

– मेघना ठक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)