घरासाठी डाऊनपेमेंट उभे करताना काय करू नये?

घर घेणे प्रत्येकाचे स्वप्न असते. डोक्यावर सुरक्षित छप्पर असले पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असते. म्हणजेच आपल्या मालकीचे घर असावे अशी प्रत्येकाची तीव्र इच्छा असते.

घर घेणे हा आयुष्यातील एक मोठा निर्णय असतो. त्यामुळेच आयुष्यातील प्रत्येक मोठा निर्णय घेताना खूप तयारी करावी लागते त्याचप्रमाणे घर घेतानादेखील सगळ्यात पहिली तयारी असते ती डाऊनपेमेंटची. आता घर घेण्यासाठी कर्ज मिळण्याची सुविधा सहज उपलब्ध असते. मात्र आपल्या घराच्या किंमतीच्या 80 ते 90 टक्के रक्कम कर्जरूपाने मिळण्याची सुविधा असते. मात्र उरलेली दहा ते वीस टक्के रक्कमही मोठी असते. म्हणजेच घर खरेदी करणाऱ्याने भरण्याच्या ह्या हिश्श्याची रक्कमही ग्राहकासाठी मोठी असते. ही रक्कम उभी करण्यासाठी आपण घाईने चुकीचे निर्णय घेतले तर स्वतःची आणि कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटण्याची आणि आर्थिक सुरक्षितता धोक्या्त येण्याची शक्यता असते. त्यामुळे डाऊनपेमेंटची रक्कम उभी करताना काय करू नये याविषयी…

निवृत्तीसाठीच्या रकमेला हात घालू नका

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवृत्तीनंतरच्या गरजांसाठी प्रत्येकाने पीएफ, पीपीएफ, म्युच्युअल फंड अशा विविध ठिकाणी गुंतवणूक केलेली असते. ती गुंतवणूक डाऊनपेमेंटसाठी काढणे हा सगळ्यात सोपा मार्ग असतो. पण तो योग्य मार्ग ठरत नाही. एकदा का तुम्ही निवृत्तीनंतरच्या निधीतून रक्कम काढू लागलात की ते पैसे संपल्यानंतरच तुम्ही थांबता. सध्या आयुष्यमान वाढत आहे. त्यामुळे माणूस जास्त वर्षे जगतो. स्वाभाविकपणे निवृत्तीनंतर समाधानाने जगण्यासाठी हाताशी पुरेशी गुंतवणूक असावी लागते. त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) किंवा तुमच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातील (पीपीएफ) रक्कम डाऊनपेमेंटसाठी काढण्याचा विचार असेल तर या निर्णयाचा फेरविचार करा. आणीबाणीच्या प्रसंगी किंवा तातडीच्या प्रसंगात पीपीएफमधील पैसे काढले जावेत. मात्र घरासाठी डाऊनपेमेंटची रक्कम उभी करण्यात कुठलीही आणीबाणी किंवा तातडी नसते. कारण जेव्हा तुम्ही भविष्य निर्वाह निधी दरमहा गुंतवणूक करत असता तेव्हा दीर्घकाळात चक्रवाढ व्याजाचा परिणाम किती प्रभावी आणि मोठा परतावा देणारा असतो हे तुम्हांला आत्ता कळण्याची स्थिती नसते. त्यामुळे दीर्घमुदतीच्या या गुंतवणुकीला हात लावण्याचा विचार मनातून काढून टाका.

मुलांसाठीच्या गुंतवणुकीपासून लांब रहा –

मुलांच्या शिक्षणासाठी जी गुंतवणूक करण्यात आली आहे तिच्यातून काही रक्कम काढण्याचा मोह होऊ शकतो. शिक्षणासाठीच्या गुंतवणुकीतून तुम्ही एकदा रक्कम काढली की नंतर मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणुकीचे तुम्ही जे उद्दीष्ट ठेवले आहे ते पूर्ण होऊ शकणार नाही. मग मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल आणि तुमच्या आर्थिक व्यवहारांवर मोठा ताण येऊ शकतो. एकाचवेळी गृहकर्ज, शिक्षण कर्ज असे हप्ते फेडायचे म्हटले तर आर्थिक ताणामुळे एखादे कर्जखाते एनपीएमध्ये जाण्याचा मोठा धोका असतो.

पर्सनल लोन घेऊ नका –

पर्सनल लोनचा व्याजदर खूप जास्त असतो. त्यामुळे एकाचवेळी दोन्ही कर्जे फेडायची म्हटल्यावर तुमचा आर्थिक कणाच कोसळून पडण्याची शक्योता निर्माण होऊ शकते. पर्सनल लोनचा व्याजदर 15 ते 18 टक्के असल्याने दीर्घकाळ हप्ते भरत राहिले तरी मुद्दलाची रक्कम फारशी हलताना दिसत नाही. त्यातही घराच्या कर्जाचा हप्ता आणि पर्सनल लोनचा हप्ता दीर्घकाळ चालत राहणार असल्याने तुम्हांला आर्थिक आघाडीवर अजिबात उसंत मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

आयुर्विमा पॉलिसी सरेंडर करू नका –

पॉलिसी सरेंडर करण्यामुळे तुमचा डाऊनपेमेंटचा प्रश्न सुटू शकतो पण तुम्ही भविष्यात कुटुंबाच्या समस्या वाढवून ठेवत असता. या निर्णयामुळे तुमच्या कुटुंबाची भविष्यातील आर्थिक सुरक्षितता धोक्यासत आलेली असते. फार तर या पॉलिसीवर कर्ज घेण्याचा पर्याय तुम्ही स्वीकारू शकता. बॅंकेकडून कर्ज घेण्याच्या तुलनेत विमा कंपनीकडून पॉलिसीवर घेतलेल्या कर्जावर व्याजदर कमी असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)