हॉलीवूड ऍक्‍टर निकोलस केज पाचव्यांदा लग्नाच्या बोहल्यावर

हॉलीवूडचा प्रसिद्ध ऍक्‍टर निकोलस केज पाचव्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढला आहे. 57 वर्षीय निकोलस केजने 27 वर्षीय गर्लफ्रेंड रिको शिबाता बरोबर लग्न केले आहे. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यावर निकोलस केजने आपल्या विवाह समारंभाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या दाम्पत्याचे लग्न 16 फेब्रुवारी रोजी लास वेगासमधील एका आलिशान हॉटेलमध्ये झाले आहे. एवढे गुपचूप लग्न करण्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

निकोल केज आणि शिबाता यांच्या या विवाह समारंभामध्ये निकोलसच्या आतापर्यंतच्या सर्व माजी पत्नी उपस्थित होत्या, हे विशेष. या दोघांचे प्रेमसंबंध कुठे सुरू झाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय कधी घेतला, ही माहिती आता यथावकाश पुढे येईल. निकोलस केजसाठी 16 फेब्रुवारी हा दिवस काही खास औचित्याचा आहे. याच दिवशी निकोलसच्या दिवंगत वडिलांचा वाढदिवस असायचा. ते प्रसिद्ध लेखक आणि कला समीक्षक होते. शिबाता ही जपानी मुलगी आहे.

त्यामुळे निकोलस-शिबाता यांचा विवाह जपानी आणि अमेरिकेच्या प्रथेला अनुसरून संयुक्‍तपणे साजरा केला गेला. लग्नामध्ये जपानी संस्कृतीचे प्रतिक असलेला किमोनो शिबोतोने घातला होता. तर निकोलसनेही टक्‍सीडो हा पारंपरिक वेश परिधान केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.