न्यूयॉर्क : हॉलीवूडचे प्रसिद्ध कॅनेडियन अभिनेता ख्रिस्तोफर प्लमर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कनेक्टिकटमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्लमरच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांची 51 वर्षीय पत्नी एलेन टेलर त्याच्यासमवेत उपस्थित होती.
दरम्यान, ख्रिस्तोफर प्लमर यांना अजूनही ‘द साउंड ऑफ म्युझिक’ सिनेमातील कॅप्टन जॉर्ज वॉन ट्रॅपच्या भूमिकेत प्रेक्षक पसंत करतात. प्लमर यांना एक ऑस्कर पुरस्कार, दोन टोनी पुरस्कार आणि दोन एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्लमर यांनी सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट संगीत फिल्म ‘द साउंड ऑफ म्युझिक’ यात काम केले आहे. ख्रिस्तोफर यांनी आपल्या 70 वर्षांच्या कारकीर्दीत हॉलिवूड फिल्म जगतात अनेक भूमिका केल्या.