मुंबई : निवडणुकांचे महत्व इतकंच वाटते, तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घ्या, असे म्हणत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला टोला लगाविला. राज ठाकरे म्हणाले, एक देश, एक निवडणूक या विधेयकाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल.
या कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी. बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळले किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
देशात वन नेशन वन इलेक्शन या विधेयकासंदर्भात मी आता पूर्ण वाचले नाही. त्यामुळे मी आता त्याबाबत सविस्तर बोलणे योग्य होणार नाही. लोकशाहीमध्ये हे शक्य आहे का नाही? याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. हे सर्व सोप नाही. पण अशा पद्धतीने निवडणुका घेणे शक्य आहे का? हे आधी पाहावे लागेल.
सुप्रिया सुळे, खासदार