सातारा, (प्रतिनिधी) – प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाबद्दल अभिमान आहे. देशप्रेम वृद्धिंगत व्हावे तसेच देशाप्रती प्रत्येकाला असेलला अभिमान वृद्धिंगत व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान सुरु केले आहे.
भारताचा स्वातंत्र्यदिन हा एक उत्सव व्हावा यासाठी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत सातारा येथील मोती चौकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते नागरिकांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक मोने, अविनाश कदम, अमोल मोहिते, रवी ढोणे, धनंजय जांभळे, सिद्धी पवार, दीपलक्ष्मी नाईक, बाळासाहेब खंदारे, शेखर मोरे- पाटील, विजय काटवटे, शकील बागवान, रवी माने, अशोक जाधव, भाजपचे विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी,
राहुल शिवनामे, ऍड. प्रशांत खामकर, विक्रम बोराटे, चंदन घोडके, प्रवीण शहाणे, आशा पंडित, हर्षल चिकणे, सुरज जांभळे, प्रतीक शिंदे, सचिन कांबळे, रीना भणगे, वनिता पवार, अमोल कांबळे, सुनील काळेकर यांच्यासह सर्व आजी- माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या देशाने नुकताच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला आहे. पंतप्रधान मोदीजींनी आपल्या देशाचे नाव विविध स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे करण्याचे काम केले आहे. आपल्या देशाप्रती प्रेम, आदर आणि स्वाभिमान वृद्धिंगत व्हावा म्हणून त्यांनी हर घर तिरंगा अभियान सुरु केले.
आपला स्वातंत्र्यदिन हा एक मोठा उत्सव आहे आणि तो मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला पाहिजे यासाठी प्रत्येक घरावर तिरंगा फडकला पाहिजे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी उद्या १५ ऑगस्टला आपल्या घरावर तिरंगा फडकावून या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले.
आज दुचाकी रॅलीचे आयोजन
दरम्यान, उद्या गुरुवार दि. १५ रोजी स्वातंत्र्यदिनी सातारा शहरात भव्य तिरंगा दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी मैदान येथून सायंकाळी ४ वाजता मोती चौक ते पोवई नाका आणि पुन्हा पोवई नाका ते मोती चौक अशी तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.
या रॅलीचे नेतृत्व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले करणार असून रॅलीत सर्व आजी- माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.