नवी दिल्ली : भारताची अनुभवी स्ट्राइकर राणी रामपाल हिच्याकडे आगामी न्यूझीलंड दौ-यासाठी भारतीय महिला हाॅकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे तर गोलरक्षक सविता पूनिया ही संघाची उपकर्णधार असणार आहे. हाॅकी इंडियाने मंगळवारी २० सदस्यीय संघाची घोषणा केली.
Star striker Rani Rampal will lead a 20-member Indian women's hockey team for the tour of New Zealand, beginning on January 25 in Auckland.#HockeyIndia pic.twitter.com/cgZvR1EVWu
— Doordarshan Sports (@ddsportschannel) January 14, 2020
न्यूझीलंड दौ-यात भारतीय महिला संघ २५ जानेवारीला एक सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरूध्द २७ आणि २९ जानेवारीला सामने होतील. यानंतर ब्रिटन संघाविरूध्द ४ फेब्रुवारीला एक सामना होईल, तर ५ फेब्रुवारीला पुन्हा न्यूझीलंडविरूध्द सामना होईल आणि दौ-याचा समारोप होईल.
भारतीय महिला संघ जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर तर न्यूझीलंडचा संघ सहाव्या आणि ब्रिटेनचा संघ पाचव्या स्थानी आहे.
Which #IndianEve will you be keeping an eye out for?#IndiaKaGame pic.twitter.com/1FcPZcnihI
— Hockey India (@TheHockeyIndia) January 14, 2020
भारतीय महिला संघ : रानी रामपाल (कर्णधार), शर्मिला देवी, नवनीत कौर, ललरेमसियामी, वंदना कटारिया, नवजोत कौर, निशा, नमिता टोपो, उकदिता, मोनिका, लिलिमा मिंज, नेहा, सोनिका, दीप ग्रेस एक्का,गुरजीत कौर, रीना खोखर, सलीमा टेटे, सुशीला चानू, गोलरक्षक सविता पूनिया (उपकर्णधार) आणि रजनी इतिमारपू.