हॉकीला सेकंड बेंच मिळेल – रवीचंद्र सिंग

नवी दिल्ली – भारताच्या वरिष्ठ हॉकी संघातील चिंगलेसना सिंग व महिला संघाची हरमनप्रीत सिंग यांच्याकडून प्रेरणा घेत आज शेकडो मुले हॉकीकडे वळली आहेत. त्यांच्यातूनच नवी गुणवत्ता समोर येईल व येत्या काळात भारतीय हॉकीला भक्‍कम सेकंड बेंच मिळेल, असा विश्‍वास भारताचा नवोदित हॉकीपटू रवीचंद्र सिंग याने व्यक्त केला आहे. 

2017 पासून भारताच्या दोन्ही वरिष्ठ संघांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. वरिष्ठ संघातील खेळाडूंच्या खेळामुळे नवोदितांना प्रेरणा मिळते. मी पदार्पण केल्यापासूनच वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीतून अनेक गोष्टी शिकत आहे. याच जोरावर पुढील काळात देशाच्या संघाला अत्यंत गुणवत्ता असलेला सेकंड बेंच मिळेल, असा विश्‍वाही त्याने व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.