हिंगोली – कयाधू नदीत पोहण्यासाठी गेलेल्या उदयोन्मुख हाॅकीपटुचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चंदन दिलीप ठाकुर (वय 22) असे मृत खेळाडूनचे नाव आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे शुक्रावरी दुपारी घडली.
अकोला येथील उदयोन्मुख हाॅकीपटु चंदन हा 15 सप्टेंबर रोजी नांदापूर येथे मामा रगदिरसिंग ठाकुर यांच्या घरी आजीसोबत आला होता. 17 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास आजीला सोबत घेऊन कयाधु नदीपात्रात तो पोहण्यासाठी गेला. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास त्याने कयाधु नदी पात्रात उडी मारली. नदी पात्रात उडी मारल्यानंतर पाण्याचा अंदाज आला नसावा किवा नदीतील दगड लागला असावा, यामुळे तो वर आलाच नाही. खुप वेळ झाला तरी तो बाहेर येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर काठावर बसलेल्या आजीने घरी जाऊन माहिती दिली.
मामा व ग्रामस्थांच्या मदतीने कयाधु नदीपात्रात चंदनचा शोध घेण्यात आला. पोहण्याच्या ठिकाणापासून 2 किलोमीटर अंतरावर सोडेगाव पुलाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. यानंतर चंदनचा मृतदेह शुक्रवारी रात्री अकोल्याकडे नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी या घटनेमुळे हॉकी क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.