भारतीय महिलांनी केला आयर्लंडचा सहज पराभव

मुरसिया – भारतीय महिला हॉकी संघाने खेळ उंचावत हॉकी विश्वचषकात रौप्य पदक जिंकणाऱ्या आयर्लंडच्या महिला संघाचा दुसऱ्या मैत्रीपूर्ण लढतीत 3-0 असा पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. त्यात भारतासाठी नवज्योत कौर( 13व्या मि.), रीना खोकर(26 मि.) आणि गुरजीत कौर यांनी गोल नोंदवले. पहिला मत्रीपूर्ण सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता.

या सामन्यात सुरुवातीपासूनच भारतीय महिलांनी आक्रमक खेळ करत आयर्लंडच्या बचावफळीला व्यस्त ठेवले. त्यानंतर 13 व्या मिनिटाला नवज्योत कौरने गोल नोंदवता भारताला आघाडी मिळवून दिली. तर 26 व्या मिनिटाला दीप ग्रेस इक्काच्या पासवर गोल करत रीना खोकरने भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. त्यानंतर मध्यंतरापर्यंत आणखी गोल होऊ शकला नाही.

तिसऱ्या सत्रात सुरुवातीला आयर्लंडला पेनल्टी कॉर्नर बहाल करण्यात आला आपण त्याचा फायदा उचलण्यात ते अपयशी ठरले. परंतु, अखेरच्या सत्रात पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताने आघाडी 3-0 अशे केले आणि सामना जिंकला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)