ब्युनोस आयर्स – भारतीय महिला हॉकी संघाला अर्जेटिना हॉकी दौऱ्यातील सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारताला अर्जेटिनाच्या ब संघाने 3-2 असे पराभूत केले.
या स्पर्धेत गेल्या आठवड्यापासून सातत्याने सरस खेळ करत असलेल्या भारतीय संघासाटी हे दोन सामने अत्यंत निराशाजनक ठरले.
या सामन्यात भारताच्या सलिमा टेटेने 6 व्या तर, गुरजित कौरने 42 व्या मिनिटाला गोल केले. यजमान संघाकडून सोल पागेला, कॉंस्टंझा सेरूनडोलो व ऑगस्टिना गोझ्रेलॅनी यांनी गोल करत विजय मिळवून दिला.