बर्लिन – करोनाचा धोका युरोपात पुन्हा वाढत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रो-हॉकी लीगचे महत्त्वाचे सामने पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आले आहेत. ब्रिटन, बेल्जियम व चीनने करोनाच्या धोक्यात प्रवास करण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने सांगितले आहे.
यजमान जर्मनीलाही आता सामने खेळता येणार नसल्याचे स्पष्ट झाले असून भारतीय हॉकी महासंघ देखील आगामी स्पर्धेत सहभागी होण्याबात महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सध्या तरी लीगचे पुरुष गटातील केवळ दोनच सामने लांबणीवर टाकले गेले असले तरी पुढील सामन्यांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
अर्थात करोनाचा धोका सध्या वाढताना दिसत असला तरीही पुढील वर्षीच्या प्रारंभातील स्पर्धांबाबत अद्याप निर्णय घेतला जाणार नसून सर्व परिस्थितीचा आढाव घेतल्यावरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही महासंघाने सांगितले आहे.