Hockey India Junior Men National Championship 2024 :- उत्तर प्रदेश संघाने कर्नाटकला तर पंजाब संघाने हरियाणा संघाला पराभूत करताना कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
येथे झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये पहिल्या उत्तर प्रदेश संघाने कर्नाटक संघाला ३-१ असे पराभूत करून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. उत्तर प्रदेशच्या राजेश यादवने ४१ व्या मिनिटाला, अजित कुमारने ४५ व्या मिनिटाला गोल करताना संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती.
Day 8 Results from the 14th Hockey India Junior Men National Championship 2024.#HockeyIndia #IndiaKaGame
.
.
.@CMO_Odisha @IndiaSports @Media_SAI@sports_odisha @Limca_Official @CocaCola @FIH_Hockey pic.twitter.com/siQNr6i0nE— Hockey India (@TheHockeyIndia) September 18, 2024
कर्नाटक संघाचा कर्णधार असलेल्या सुनील पीबीने ५३ व्या मिनिटाला गोल करून ही आघाडी २-१ अशी कमी केली होती. उत्तर प्रदेशच्या फाहाद खानने ५७ व्या मिनिटाला गोल करताना पुन्हा ३-१ अशी आघाडी विजयी आघाडी घेतली. यानंतर कर्नाटक संघाने प्रयत्न करून देखील त्यांना गोल करता आला नाही.
China Open 2024 : भारताच्या मालविका बनसोडनं चीन ओपनमध्ये केला मोठा उलटफेर….
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये पंजाब संघाने हरियाणा संघाला शूटआउटमध्ये ७-६ असे पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. लढतीत दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी बजावली. निर्धारित वेळेत सामना ४-४ असा बरोबरीत राहिला. त्यानंतर झालेल्या शूटआउटमध्ये पंजाबने ३ गोल करून आघाडी घेतली. मात्र हरियाणा संघाला दोनच गोल करता आले.