आशियाई स्पर्धा २०१८ : भारतीय हाॅकी संघाचा आणखी एक ‘विशाल’ विजय

श्रीलंकेचा २०-० ने केला पराभव

जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज दहाव्या दिवशी आतापर्यत भारताने ३ रौप्यपदक आणि १ कांस्यपदक जिंकले आहे. भारत देश आशियाई स्पर्धेत ८ सुवर्ण, १६ रौप्य आणि २१ कांस्य असे एकूण ४५ पदकांसह पदकतालिकेत ९ व्या स्थानावर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज हाॅकीमध्ये भारतीय पुरूष संघाने एक विशाल विजय नोंदविला आहे. हाँगकाँगला २६-० ने पराभूत केल्यानंतर भारतीय संघाने मंगळवारी साखळी सामन्यातील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा २०-० ने पराभव केला आहे.

सामन्यात रूपिंदर सिंग आणि आकाशदीप या खेळाडूंनी भारतासाठी प्रत्येकी ३ गोल करत हॅट्रिक साधली. भारतीय संघाने याआधीच दक्षिण कोरियाचा ५-३ असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश निश्चित केला आहे. आज श्रीलंकेविरूध्द भारताला फक्त सामना अनिर्णयीत करण्याची आवश्यकता होती. मात्र भारताने दमदार कामगिरी करत श्रीलंकेचा २०-० ने पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)