#Tokyo2020 : भारताचा हॉकी संघ जाहीर, मनप्रित व श्रीजेशला विश्रांती

नवी दिल्ली  – टोकियो येथे पुढील महिन्यात होणाऱ्या ऑलिंपिक चाचणी स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष हॉकी संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. कर्णधार मनप्रितसिंग व गोलरक्षक पी.आर. श्रीजेश यांना विश्रांती देण्यात आली आहे. ही स्पर्धा 17 ते 21 ऑगस्टदरम्यान होणार आहे.

भारतीय संघाचे कर्णधारपद ड्रॅगफ्लिकर हरमानप्रित सिंग याच्याकडे देण्यात आले असून उपकर्णधारपदाची जबाबदारी मनदीप सिंग सांभाळणार आहे. अनुभवी खेळाडू रुपींदरपाल सिंग व सुरेंदरकुमार यांचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहॅम रीड यांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये ऑलिंपिक पात्रता स्पर्धा होणार असल्यामुळे काही खेळाडूंना विश्रांती देण्याची आवश्‍यकता होती.

गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे काही महिने विश्रांती घेणाऱ्या एस.व्ही.सुनील याचे या संघात पुनरागमन झाले आहे. कृष्णन बहादूर पाठक व सूरज करकेरा यांची गोलरक्षक म्हणून या संघात निवड झाली आहे.

भारतीय संघ – हरमानप्रित सिंग (कर्णधार), मनदीप सिंग (उपकर्णधार), कृष्णन बहादूर पाठक, सूरज करकेरा, गुरिंदर सिंग, कोठाजित सिंग खाडग्बम, हार्दिक सिंग, नीलकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद, जसकरण सिंग, गुर्साहिबिजित सिंग, नीलमसंजीव झेस, जरमानप्रित सिंग, वरुणकुमार, आशिश टोपनो, एस.व्ही.सुनील, गुर्जंट सिंग, शमशेर सिंग.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.