#HobartTennis : सानिया-नादिया अंतिम फेरीत दाखल

होबार्ट : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची युक्रेनची साथीदार नादिया किचेनोक यांनी हाॅबर्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सानिया-नादिया जोडीने उपांत्य फेरीच्या सामन्यात स्लोवेनियाच्या तमारा जिदानसेक आणि चेक गणराज्यच्या मेरी बाउजकोव या जोडीचा ७-६, ६-२ असा पराभव केला. आता अंतिम सामन्यात सानिया-नादिया या जोडीसमोर चीनच्या व्दितीय मानांकित शुवाई पेंग आणि शुवाई झांग या जोडीचे आव्हान असणार आहे.

दरम्यान, याआधी स्पर्धेच्या महिला दुहेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत सानिया-नादिया जोडीने अमेरिकेच्या वेनिया किंग-क्रिस्टिना मॅकहाले या जोडीचा ६-२, ४-६, १०-४ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता तर पहिल्या सामन्यात सानिया मिर्झा-नादिया किचेनाॅक जोडीने जाॅर्जियाची ओक्साना कलाश्निकोवा आणि जपानची मियू कातो या जोडीचा २-६, ७-६(३), १०-३ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.