होबार्ट : सुमारे दोन वर्षानंतर स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करणारी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने होबार्ट इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीमध्ये युक्रेनची जोडीदार नादिया किचनाॅक हिच्यासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
In just their second game playing together, @MirzaSania and Nadiia Kichenok are through to the #HobartTennis doubles semifinals after defeating American duo Vania King and Christina McHale 🙏 pic.twitter.com/D9bib0Y8Hs
— Hobart International (@HobartTennis) January 16, 2020
स्पर्धेच्या महिला दुहेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत सानिया-नादिया जोडीने अमेरिकेच्या वेनिया किंग-क्रिस्टिना मॅकहाले या जोडीचा ६-२, ४-६, १०-४ असा पराभव केला.
The return run continues for @MirzaSania as she and Nadiia Kichenok are through to the @hobarttennis doubles semifinals.
They defeat McHale/King 6-2, 4-6, 10-4 pic.twitter.com/zXkhenBmbJ
— wta (@WTA) January 16, 2020
दरम्यान, यापूर्वी स्पर्धेच्या राउंड १६ मध्ये सानिया मिर्झा-नादिया किचेनाॅक जोडीने जाॅर्जियाची ओक्साना कलाश्निकोवा आणि जपानची मियू कातो या जोडीचा २-६, ७-६(३), १०-३ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.