हिजबुल मुजाहिद्दीनने रचला होता घातपाताचा कट – मुख्य सचिव

श्रीनगर – हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्‍मीरमध्ये हल्ल्याचा कट रचला होता अशी माहिती जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्य सचिव सुब्रमण्यम यांनी पत्रकार परिषदेत दिली. सीमाभागात सुरु असलेल्या दहशतवादी कारवाया नियंत्रणात आणण्यासाठीच आम्ही राज्यात अनेक प्रकारचे निर्बंध लादले होते.

त्याचबरोबर सध्या जम्मू काश्‍मीरमधल्या 22 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये शांतता आहे. 5 जिल्ह्यांमध्ये काहीसा तणाव आहे. मात्र या पाच जिल्ह्यांमधला तणाव निवळण्याच्या दृष्टीनेही आम्ही पावलं टाकतो आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.