पुणे – मद्याची दुकाने खुली झाल्यानंतर खरेदी करून जात असलेल्यांचे छायाचित्र मोबाइलवर काढल्याने चौघांनी मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना बिबवेवाडी भागातील इंदिरानगर परिसरात घडली.
भूषण गरूड (वय 39, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. गरूड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गरुड आणि याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी ओळखीचे आहेत. या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे यांच्यामार्फत पुढील तपास सुरू आहे.