ऑस्ट्रेलियाविरुद्ध हिटमॅनचे षटकारांचे शतक

सिडनी – ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथचे दमदार शतक तर, अफलातून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत भारताच्या रवींद्र जडेजाने तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस गाजवला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर संपूष्टात आला तर, भारताने दिवसातील उर्वरित खेळात आपल्या पहिल्या डावात सलामीवीर शुभमन गील याच्या अरधशतकी खेळीच्या जोरावर 2 गडी गमावून 96धावा केल्या आहेत.

भारताच्या डावाची सुरूवात थाटात करताना हिटमॅन रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी 70 धावांची सलामी दिली. ही जोडी यजमानांची डोकेदुखी ठरेल असे वाटत असतानाच जोश हेजलवुडने रोहितला 26 धावांवर बाद केले.

दरम्यान, आज कसोटी क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध षटकारांचे शतक करणारा भारताचा पहिलाच फलंदाज असा विक्रम हिटमॅन रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केला. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने इंग्लंडविरुद्ध 130 षटकार फटकावले आहेत.

मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध यापूर्वी एकाही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. यापूर्वी इंग्लंडचा इयान मॉर्गनने 63, न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅकलमने 61, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व महेंद्रसिंग धोनी यांनी प्रत्येकी 60 षटकार फटकावले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.