इस्लामाबाद: ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने लंडनमधील पाकिस्तान उच्चायोगाच्या खात्यांमधून ४५० कोटी रुपये दंड वसूल करण्याचा आदेश दिला आहे. हा दंड एनएबीने परदेशी संपत्ती वसूली कंपनी ब्रॉडशीट एलएलसीचे पैसे वेळेवर न दिल्याने ठोठावला आहे. एका स्थानिक वृत्तपत्राने याबाबतची माहिती दिली आहे.
पाकिस्तानच्या एका या वृत्तपत्राने याविषयी माहिती दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर युनायटेड बँक लिमिटेड यूकेने २९ डिसेंबर रोजी पाकिस्तान उच्चायोगाला पत्र लिहिले ज्यात सांगण्यात आले होते की, न्यालायाच्या २८,७०६.५३३.३५ अमेरिकन डॉलर इतकी रक्कम जमा करण्याच्या आदेशाचे पालन करण्यासाठी डेबिट खात्याच्या तपशीलांसह पैसे भरण्याचे लिखित आदेश त्यांनी द्यावेत.
बँकेने पाकिस्तानी उच्चायोगाला असेही सांगितले की, ३० डिसेंबरपर्यंत हे आदेश लिखित स्वरूपात न मिळाल्यास न्यायालयाच्या आदेशात निर्धारित केलेली रक्कम वसूल करण्यासाठी उच्चायोगाच्या खात्यांमधून एकतर्फी पैसे काढण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसेल.
पाकिस्तान उच्चायोगाच्या नावे संचलित खात्यात पैसे पडून या बातमीत सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे असे सांगण्यात आले आले की एनएबीचे साधारण ४५० कोटी रुपये यूबीएल, लंडनच्या एका खात्यात पडून होती जे ब्रिटनमध्ये पाकिस्तान उच्चायोगाच्या नावे चालवल जाते.