नाशिकमध्ये हेमंत गोडसेंनी रचला इतिहास

खासदार समीर भुजबळ यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव

नाशिक – 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदारसंघातून दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा त्यांनी पराभव केला आहे. नाशिककर एकदा निवडून दिलेला लोकप्रतिनिधी दुसऱ्यांदा निवडून देत नाहीत, असा इतिहास आहे. मात्र यंदा हेमंत गोडसेंनी नवा इतिहास रचला आहे.

हेमंत गोडसेंनी या निवडणुकीत आपलाच विक्रम मोडला आहे. मागील निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा 1 लाख 87 हजार मतानी केला होता पराभव केला होता. या निवडणुकीत हेमंत गोडसेंना 4 लाख 30 हजार 8 मतं मिळाली, तर समीर भुजबळ यांना 2 लाख 21 हजार 355 मतं मिळाली. या निवडणुकीत बंडखोर अपक्ष माणिकराव कोकाटे यांना 1 लाख 6 हजार 917 मतं मिळाली आहेत. निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून 18 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. त्यात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात मुख्य लढत होती.

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा तसा राष्ट्रवादीचा गड. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गडाला शिवसेना-भाजपने सुरुंग लावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचेच तगडे नेते छगन भुजबळ हे येथून नेतृत्व करतात. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना पराभूत केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.