रिलायन्सने रचला इतिहास; ९ लाख कोटी मार्केट कॅप असणारी देशातील पहिली कंपनी 

मुंबई – मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने इतिहास रचला आहे. नऊ लाख कोटींचे बाजार भांडवल असणारी रिलायन्स ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. हे बाजार भांडवल सहा सरकारी कंपन्यांएवढे आहे. आज सुरुवातीला कंपनीचा शेअर २ टक्क्यांनी वधारला आणि त्यानंतर कंपनीचा शेअर १,४२३ रुपयांवर पोहचला. जानेवारीपासून रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर २६ टक्क्यांनी वाढला आहे.

पेट्रोलियम, रिटेल आणि टेलिकॉमसारख्या विविध क्षेत्रात पसरलेल्या रिलायन्सने आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण ६.२३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

देशातील १० मोठ्या कंपन्यांची यादी (बाजार भांडवल)
(1) रिलायन्स इंडस्ट्रीज – ९ लाख कोटी
(2) टीसीएस (टाटा कंस्लटेंसी सर्व्हिसेस) – ७.६७ लाख कोटी
(3) एचडीएफसी बँक – ६.७० लाख कोटी
(4) एचयूएल (हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड) – ४.५४ लाख
(5) एचडीएफसी लिमिटेड – ३.५९ लाख कोटी
6) इन्फोसिस – ३.२७ लाख कोटी
(7) कोटक महिंद्रा बँक – ३.०६ लाख कोटी
(8) आयटीसी (इंडियन टोबॅको कंपनी) – ३.०३ लाख कोटी
(9)  आयसीआयसी बँक – २.८२ लाख कोटी
(10) बजाज फायनान्स – २.४० लाख कोटी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)