ऐतिहासिक कामगिरी : पायलटने विंगसुट घालून केले स्कायडाव्हिंग

 विंग कमांडर तरूण चौधरींना मिळाला पहिल्या विगंसुट स्कायडायव्हरचा मान

नवी दिल्ली : आकाशात उडणाऱ्या हेलिकॉप्टरमधून विंग कमांडर तरुण चौधरी यांनी विंगसुट घालून स्कायडाव्हिंग केली आहे. भारतीय हवाई दलातील एखाद्या पायलटने विंगसुट स्कायडायव्हिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे विंगकमांडर चौधरी यांच्या या ऐतिहासिक कामगिरीवर सर्व स्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

21 जुलै 2019 रोजी कारगिल दिनानिमित्त जोधपूरमध्ये आयोजित हवाई दलाच्या विशेष कार्यक्रमात त्यांनी ही कामगिरी पार पाडली. भारतीय हवाई दलाच्या MI-17 या हेलिकॉप्टरमधून 7 हजार 500 फूट उंचीवरुन त्यांनी विंगसुटच्या सहाय्याने बाहेर उडी घेत आकाशात तरंगण्याचे आव्हान पूर्ण केले. या कामगिरीची भारतीय हवाई दलाने ट्‌विट करून माहिती दिली आहे. ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, कोणतीही साहसी मोहिम असो किंवा एखादी कामगिरी असोत अशा प्रकारचे साहस दाखवणे हा हवाई दलाचा स्वभाव असून दक्षतेची पावती आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.