कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण

न्यूयॉर्क : सध्या जगभरात करोनाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थिती अनेक देशामध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवरही होताना दिसत आहे. न्यूयॉर्कमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली.

२० एप्रिल रोजी कच्च्या तेलाच्या किंमतीत एवढी घसरण झाली की कच्च्या तेलाची किंमत बंद बाटलीतील पाण्यापेक्षाही कमी झाल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेत कच्च्या तेलाची किंमत शून्यापेक्षाही कमी म्हणजेच -३७.५६ डॉलर्स प्रति बॅरल इतकी घसरल्याचे सांगण्यात येत आहे.  मे महिन्यात पुरवल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतीत ही घट झाली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे सर्वांच्या प्रवासावर बंदी आहे. त्यामुळे मागणीतही घट झाल्याने  कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याचे म्हटले जात आहे. त्यातच सौदी अरेबिया आणि रशियामध्ये सुरू असलेल्या दर युद्धामुळेही मागणीत घसरण झाली आहे. जगभरात कच्च्या तेलाचे उत्पादन वाढले आहे परंतु मागणीत घट झाल्याने मोठ्या प्रमाणात दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भारत कच्च्या तेलाची ८० टक्के आयात करतो. तसेच भारताला डॉलर्समध्येच याची रक्कम द्यावी लागते. कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा फायदा भारताला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.