हुर्रे…पुण्यातल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारकेही खुली

पुणे – जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. करोनासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

 

 

करोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये दि.31 मार्चपासून बंद आहेत. पुणे जिल्ह्यात विविध ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात दुर्गप्रेमी, पर्यटक भेटी देत असतात. यामुळे स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होतो.

 

 

आता ही सर्व ठिकाणे खुली करण्यात येणार असल्याने, तेथे मानक कार्यप्रणालींचा अवंलब करणे बंधनकारक असणार आहे. आवश्यक शारिरिक अंतर बाळगणे, मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात स्वच्छ करणे बंधनकारक असणार आहे.

 

 

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.