मुंबई – अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या आगामी हिरकणी चित्रपटाची झलक नुकतीच प्रेक्षकांना पहायला मिळाली. आता हिरकणी उर्फ हिराच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि प्रेमळ अशा व्यक्तिरेखेसोबत ओळख होणार आहे. ज्याच्यावर हिराचा जीव जडलाय. हिराचं ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम आहे ती व्यक्ती म्हणजे जीवा. ‘हिरकणी’ चित्रपटात जीवा या व्यक्तिरेखेची भूमिका अभिनेता अमित खेडेकर याने साकारली आहे. विशेष म्हणजे अभिनेता विकी कौशलने हे गाण ट्विटरवरुन रिलीझ केले आणि त्याने हिरकणी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा ही दिल्या आहेत.
Listen to this lovely song जगनं हे न्यारं झालं जी from #Hirkani, it’s an absolute gem. I am privileged to launch this lovely rendition. Looking forward to this heroic journey of a mother this DIWALI@mapuskar_rajesh@prasadoak17
@amitraj819@mesonalee16https://t.co/yzFumtwaIg pic.twitter.com/NrxYNZSUoz— Vicky Kaushal (@vickykaushal09) October 7, 2019
दरम्यान, या चित्रपटातील सोनाली आणि अमित यांच्या प्रेमकथेवर आधारित गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. ‘जगनं हे न्यारं झालं जी’ हे या गाण्याचे शीर्षक आहे. या गाण्याचे बोल संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिले आहे.
‘जगनं हे न्यारं झालं जी’ या गाण्याला अमितराज यांनी संगीतही दिले आहे आणि त्यांनी हे गाणं गायले देखील आहे, तसेच गायिका मधुरा कुंभार यांनी अमितराज यांना गाण्यात साथ दिली आहे.राजेश मापुस्कर हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.