धाडसी आईचं चित्र उभं राहणारं ‘हिरकणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

हे फक्त एक पाऊल आहे, अजून आख्खा कडा बाकी आहे..

मुंबई – हिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं. गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे जी घरी आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाची खोल कडा उतरुन खाली जाते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी ‘हिरकणी’ची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार याची उत्सुकता अनेकांमध्ये असणार यात शंका नाही. प्रेक्षकांना एकीकडे ‘हिरकणी’ चित्रपटाविषयी उत्सुकता असताना दुसरीकडे या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

मराठी अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ पाठ्यपुस्तकातील हिरकणीला रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. टीझर मध्ये सोनाली कुलकर्णीचे धाडसी रूप दिसून येत. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडणार आहे. अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘हिरकणी’चे पोस्टर पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर येथे प्रदर्शित करण्यात आले होते.

शिवाजी महाराजांच्या रायगडाचे गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे आपल्या घरी असलेल्या बळासाठी हिरकणी गडाच्या एका बुरूजावरून खाली उतरली होती. यानंतर शिवाजी महाराजांनी त्या बुरूजाला हिरकणी बुरूज असे नाव ठेवले.

Leave A Reply

Your email address will not be published.