वाघोली (पुणे) – येथील सामाजिक कार्यकर्ते हिराभाऊ वाघमारे यांची वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सामजिक कार्याची आवड असणाऱ्या बहुजन समाजाच्या विविध प्रश्नाला न्याय देण्यासाठी हिराभाऊ वाघमारे यांनी मोलाची कामगिरी केली आहे. पुणे जिल्ह्यातील असंख्य बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना व युवकांना संघटित करून त्यांच्या मेळावा घेऊन नुकताच वंचित बहुजन आघाडीमध्ये हिराभाऊ वाघमारे यांनी प्रवेश केला होता. सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वाघमारे कार्य करत असल्याची दखल वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून देखील घेतली गेल्याने वाघमारे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. आगामी काळात जिल्ह्यातील बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे हिराभाऊ वाघमारे यांनी सांगितले.