हिंगोलीत महिला सरपंचावर तलवारीने हल्ला

हिंगोली – शहराजवळील कारवाडी येथील महिला सरपंचावर तलवारीने जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरपंचावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने कारवाडी गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पा बोथकर, असे जखमी महिला सरपंचाचे नाव आहे. त्यांच्यावर शनिवारी रात्री 2च्या सुमारास हल्लेखोरांनी घरात घुसुन हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी घरात पुष्पाचे पती, मुलगा, मुलगी सर्वजण उपस्थित होते. त्यामुळे हा हल्ला झाल्याबद्दल उलट सुलट चर्चा असून राजकीय द्वेषातून किंवा देवाण-घेवाणीच्या कारणातून झाली की दुसऱ्या कारणातून झाली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.